Tuesday, October 23, 2018

आधी आगामी रक्कम, मग मोफत सेवा

पुणे - महिन्यातील एक दिवस मोफत सेवा द्यावयाची असेल, तर आगाऊ रक्कम द्या, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप यासंदर्भात प्रस्तावच मंजूर केला नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

शिमला प्रशासन पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे अनुकरण करण्यास उत्सूक

पुणे : हिमाचल प्रदेशातील सर्वांत मोठे शहर आणि राजधानी शिमला येथील स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या ३६ सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा केला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आता शिमला स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानेही येथील विविध प्रकल्पांची व विकासकामांची माहिती घेतली.

Sunday, October 21, 2018

मुख्यमंत्र्यांची समयसूचकता : म्हणून नाकारला पुष्पगुच्छ

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. यावरून मुख्यमंत्र्यांची  प्लास्टिक बंदी वरील जागरूकता दाखून दिली आहे.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ‘अगतिक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घुस मेलीय, गटार तुंबलय, स्वछता होत नाही… महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना फोन करा.. असेच यापुढे नागरिकांना सांगणार. प्रभाग समितीमध्ये चर्चा होते, आयुक्तही आश्वासन देतात, पण कामांची टेंडर्स लागत नाहीत. आता सभा तहकूब करा नाहीतर आम्ही बाहेर पडतो… हा ईशारा कोणा विरोधकांचा नसून महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केलेली अगतिकता आज पाहायला मिळाली.

Truncated metro routes 'not to serve purpose'

PUNE: The work on Pune Metro corridor one - Pimpri to Swarga .. 


मेट्रोबाधितांचा स्थलांतराला नकार

शहरात होणार्‍या मेट्रोला आमचा अजिबात विरोध नाही; मात्र आम्हाला आमच्या जागेवरच पुनर्वसन करून द्यावे, अशी मागणी शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा व परिसरातील झोपडपट्टीधारकांनी केली आहे. 

पदपथावर पालिकेचेच अतिक्रमण

अतिक्रमणे काढून टाकून शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मुक्त करण्याची मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे महापालिका, पीएमपी आणि महावितरण यासारख्या यंत्रणांनीच शहरातील अनेक फूटपाथ अडविल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवर फेरफटका मारताना अनेक ठिकाणी पदपथांवर पीएमपीचे बस स्टॉप, 'महावितरण'चे फिडर पिलर, विजेचे खांब यासारख्या असंख्य गोष्टी पदपथावरच असल्याचे चित्र पाहायला मिळते. काही ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य कोठ्या आणि सार्वजनिक स्वच्छतागृहेदेखील पदपथावरच उभारण्यात आली आहेत. महापालिका प्रशासन पुणेकरांच्या हक्काचे पदपथ सर्व प्रकारच्या अतिक्रमणांपासून मुक्त करणार का, असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.

‘जायका’कडे पालिकेचे दुर्लक्षच

'मुळा-मुठा' नद्यांच्या शुद्धीकरणासाठी 'जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी'च्या (जायका) अर्थसाह्यातून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पाकडे केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वच सरकारी संस्थांकडून अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकल्पासाठीच्या अर्थसंकल्पातील ६५ कोटी रुपयांचे वर्गीकरण केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याबाबत पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे.

पुणे विद्यापीठाचा बीएस्सीचा पेपर फुटला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएस्सी (कम्प्युटर सायन्स) शाखेचा तृतीय वर्षाचा 'ऑबजेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग' विषयाचा पेपर शनिवारी दुपारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा ते वीस मिनिटे व्हायरल झाला.

Pune: Election office seeks help from housing societies to revise electoral rolls

For the forthcoming Lok Sabha elections, the District Election Office (DEO) has urged the cooperative housing societies to help the election department revise the electoral roll by submitting information on the eligible voters residing in their societies. A meeting of all cooperative housing society office bearers was recently called by the DEO.