एमपीसी न्यूज – महापालिकेची मान्यता घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला चाळीस फुटांपेक्षा अधिक उंचीवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ज्या होर्डिंग धारकांनी अशाप्रकारे उंची वाढवली आहे. त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून देण्यात आली आहे.
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Tuesday, October 23, 2018
पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास १६ गाडया फोडल्या
पुण्यात पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. पुण्यात कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत सोमवारी मध्यरात्री तब्बल १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली. रात्री अडीजच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी टिकाव आणि कुदळीने घाव घालून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडया फोडल्या.
दिवाळीनंतर पुण्यात पाणीबाणी, फक्त एक वेळच पुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा आणि भविष्याचा विचार करता दिवाळीनंतर पुणे शहराला एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पुणेकरांना कचर्याचा भुर्दंड
पुणे : नागरिकांच्या घरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी दरमहा 100 ते 500 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील मिळकतदाराकडून ’यूजर चार्जेस’च्या नावाखाली ही रक्कम घेतली जाणार आहे. मिळकतकरामध्ये (प्रॉपर्टी टॅक्स) या रकमेचा समावेश करण्यात येणार असून, त्यामुळे पुणेकरांना दरवर्षी 1200 ते 3000 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शहर भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
पुणे : स्थायी समितीच्या बैठकीपुर्वी आम्हाला एखादा विषय पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, समितीत अचानक मतदान करायला लावतात. त्यामुळे आमची अडचण होते, विषय आम्हाला समजून घेता येत नाहीत, अशा तक्रारी भाजपच्या समिती सदस्यांनी शनिवारी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडे केल्या. त्यामुळे महापालिकेत मंजूर होणार्या विषयांवरून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
पालिकेच्या इमारती सौरउर्जेने झळकणार
पुणे : महापालिकेच्या 34 इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सन 2016 मध्ये जाहीर करण्यात आलेली निविदा प्रक्रिया तब्बल 2 वर्षांनी म्हणजे सन 2018 मध्ये अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या मुख्य इमारतीवर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यासाठीची ही निविदा आहे. यात मुख्य इमारतीच्या टेरेसवर 825 किलो वॅट क्षमतेची कनेक्टेड रुफ टॉप सोले पी. व्ही सिस्टिम उभारण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय
पुणे - पुणे शहराचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्याच्या प्रस्तावावर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
दखल न घेतल्यास कारवाई करणार - आयुक्त व्यंकटेशम
पुणे - ‘‘पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होत आहेत. तरीही पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, तसे न झाल्यास योग्य कारवाई करू,’’ असे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले.
समस्यांच्या विळख्यात सिंहगड रस्ता
पुणे - अर्धवट अवस्थेतील पर्यायी रस्ता, जागोजागी असलेली अतिक्रमणे आणि बिनधास्त उलट दिशेने सुसाट वेगाने वाहन चालवीत येणारे दुचाकीस्वार या समस्येच्या त्रिकोणात तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) अडकला आहे. धायरी फाटा ते छत्रपती राजाराम पूल जेमतेम पाच किलोमीटर अंतरासाठी सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत तब्बल ४० मिनिटे लागतात.
आधी आगामी रक्कम, मग मोफत सेवा
पुणे - महिन्यातील एक दिवस मोफत सेवा द्यावयाची असेल, तर आगाऊ रक्कम द्या, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप यासंदर्भात प्रस्तावच मंजूर केला नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)