पुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे नगरसेवकांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. नियोजित कामांचे ठिकाण बदलण्यासोबत वर्गीकरणाच्या आग्रहामुळे बहुतांशी निविदा काढण्यात अडचणी येत असून, निविदांच्या अटी-शर्ती बदलण्याचा उद्योग होत असल्यानेच योजनांचा मुहूर्त हुकत असल्याचे दिसून आले आहे. कामे न होण्यास नगरसेवक जबाबदार असल्याचे प्रशासनानेही जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना फसण्यामागे प्रशासनापाठोपाठ नगरसेवकही जबाबदार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Wednesday, October 24, 2018
खासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या
पुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार नागपूर, अमरावती, चंद्रपूरला जाणाऱ्या बस सुटण्याच्या वेळा बदलण्याचेही ठरले.
रुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार
पुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पीएमपी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील सुमारे दोन हजार रहिवाशांना राहणे अशक्य झाले आहे.
सिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे
पुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात यशस्वी झालेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी सिमला येथे करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन
फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.
'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'
पुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था मागे असल्याचे वास्तव आहे,’’ अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
पुण्यात रोज एकवेळ पाच तास पाणी
पुणे - पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे सर्व भागांना दररोज एकवेळ सलग पाच तास पाणीपुरवठा करण्यात येईल. याची अंमलबजावणी सोमवार(ता. २९)पासून होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी जाहीर केले.
झोपडपट्टीमुक्तीसाठी थांबा १४२ वर्षे
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन होऊन बारा वर्षे पूर्ण झाली. परंतु आतापर्यंत केवळ ४७ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले. शहरातील घोषित झोपडपट्ट्यांची संख्या ५५७ आहे. सरकारचे धोरण असेच राहिले, तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी सुमारे १४२ वर्षे लागतील.
कॅबचालकांच्या संपामुळे प्रवासी वेठीस !
पुणे - कॅबधारक आणि कंपन्यांमधील वादांमुळे काही चालकांनी मंगळवारी अचानक संप केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. काही भागात चढ्या दराने कॅब उपलब्ध झाल्या तर, काही ठिकाणी कॅबच उपलब्ध झाल्या नाहीत. सुमारे तीन ते पाच हजार कॅबचालकांनी संपात भाग घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.
विकासकामांसाठी शासकीय जागा आगाऊ मिळणार
पुणे - शासकीय काम आणि सहा महिने थांब, हा सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव सरकारमधील खात्यांना देखील येत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, आता त्याला फाटा देत राज्य सरकारने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी सरकारी जागेची मागणी झाली, तर त्यांना आगाऊ जमिनीचा ताबा द्यावा, असे आदेश काढले आहेत. ताबा दिल्यानंतर उर्वरीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे विकासकामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)