पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुक पोलिसांची दंडाची रक्कम भरण्यासाठीच्या ‘पुणेट्रॅफीकॉप’ हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, या ट्रॉफीकॉपवर डेबिट कार्डचा पर्यायच देण्यात आलेला नाही. यावर केवळ क्रेडिट कार्ड धारकांनांच दंडाची रक्कम भरता येत आहे. त्यामुळे चालकांना थेट वाहतुक पोलिसांनाच गाठावे लागत आहे.
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Monday, November 5, 2018
Illegal parking: Civic body moots fine up to Rs 20k
PUNE: Leaving your vehicle in no-parking zones across the ci ..
सर्वाधिक विनातिकीट मुली, महिला!
शहरातील सार्वजनिक बसद्वारे प्रवास करणार्यांमध्ये सर्वाधिक फुकट्या महिला आणि मुली असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली. दरदिवशी जवळपास 30 ते 35 महिला आणि मुली विनातिकीट प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिक धोरणाची जबाबदारी उपायुक्तांकडे
एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिक धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त अथवा सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच दर दोन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतूद आहे.
उड्डाणपुल भूसंपादनासाठी बेकायदेशीर मार्गाचा वापर; नागरिकांचा आरोप
पौडरस्ता (पुणे) : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामासाठीचे भूसंपादन 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले होते. त्याची टाईमलाईन संपूण गेल्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. डाव्या भुसारीतील व्यंकेटेश्वरा हाईटस या इमारतीमधील एका घराचा काही भाग महापालिकेच्या कर्मचाऱ्य़ांनी तोडला. सरकारने जाहीर केलेली भरपाई रक्कम मान्य नसल्याने अनेक जणांचा या संपादनाला विरोध आहे.
'हायपरलूप'साठी आणखी एक पाऊल
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने हाती घेण्यात आलेल्या पुणे- मुंबई दरम्यानच्या "हायपरलूप' प्रकल्पास राज्य सरकारने "सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प' म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार सल्लागार यांची नियुक्ती करण्यासही पीएमआरडीएला मान्यता दिली आहे. यामुळे आतापर्यंत केवळ चर्चेत असलेला हायपरलूप प्रकल्प राबविण्यासाठीचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
फटाक्यांची वेळ पाळा; तुरुंगाची वारी टाळा !
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा सोमवारपासून (ता. 5) सक्रिय होणार आहेत.
अरेरावी करणाऱ्या वाहनचालकांवर आता कडक कारवाई
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाहनचालकांकडून हुज्जत घालण्यापासून मारहाण करण्यापर्यंतच्या प्रकारात वाढ होत आहे. दर दिवशी पोलिसांबरोबरील वादाच्या घटना शहरात घडत आहेत. परंतु आता अरेरावी करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
पाणीकोट्यावरून पालिकाच अडचणीत!
पुणे – शहरासाठी वाढीव पाणी मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, ही लोकसंख्या पालिकेस मंजूर असलेल्या पाणीकोट्याच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास दहा लाखांनी कमी आहे. त्यामुळे शासनास पाणी वाढवून देण्यासाठी पत्र पाठविल्यास निकषानुसार, महापालिकेस मंजूर पाणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडे लेखी मागणीद्वारे पाणी वाढवून मागण्याचा निर्णय मागेz घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)