पुणे – महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन 2 दिवस झाले असतानाच प्रत्येक चौकात अशा जाहिरातींना उत आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सलग सुट्ट्या लक्षात घेऊन हे जाहीरात फलक रातोरात उभारले जात आहेत.
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Tuesday, December 4, 2018
HC: When will Centre appoint Pune NGT chief?
The Bombay high court on Friday asked the Union government to spell out when it would fill the vacancy of chief of National Green Tribunal (west zone) headquartered in Pune.
प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका कधी मिळणार?
पुणे – शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात निकालाच्या उत्सूकतेमुळे नागरिकांची बी.पी. वाढणे, भोवळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मागील महिन्यात तर कामाच्या ताणाने एक पोलीसच भोवळ येऊन पडला होता. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयात प्राथमिक उपचार केंद्र कधी होणार, न्यायालयात कायमस्वरुपी रुग्णवाहिका कधी मिळणार हा, प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक संकपाळ असताना 2012 मध्ये याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
विद्यापीठात आता २४ तास वैद्यकीय उपचारांची सुविधा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आता २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करून विद्यापीठाने आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेतले आहे. अद्ययावत आरोग्य केंद्राचे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात उद्घाटन करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.
आपत्तीग्रस्तांना पालिकेकडून १९ लाख रुपयांची मदत
पुणे - पाटील इस्टेट शेजारील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ९० पेक्षा अधिक झोपड्या जळून सहाशेपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तातडीची मदत म्हणून महापालिकेने सुमारे १९ लाख रुपये तत्काळ मंजूर केले आहेत. प्रशासनाकडून ७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
एनडीएच्या १३५व्या तुकडीतून २६१ विद्यार्थी देशसेवेसाठी सज्ज
पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले.
पुणे शहरात उभारणार १०० स्मार्ट बसथांबे
पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून शहरात विविध भागांत १०० ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नवे बसथांबे एका महिन्यात उभारण्यात येणार आहेत. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या जागेवर नवे थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यातील सहा थांब्यांचे लोकार्पण गुरुवारी झाले.
पीएमआरडीए मेट्रोच्या कामाला शहर सुधारणा समितीची मंजुरी
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) शुक्रवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या हद्दीत या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
पालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प रुळावर
पुणे – पालिकेच्या 101 शाळांमध्ये ई-लर्निंग ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. 31 शाळांमध्ये क्लासरूम सुरू करण्यात आले आहेत. हे काम देण्यात आलेल्या बीएसएनएल कंपनीस हे काम करण्यासाठी जून-2018 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर-2018 उजाडला आहे. त्यामुळे 21 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा प्रकल्प अखेर रुळावर आला आहे.
37/1 ची कारवाई न करताच मेट्रो खांब उभारणी : बेकायदा ठरण्याची शक्यता
पुणे – महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आखणी (37/1 ची कारवाई) न करताच महापालिकेच्या सुमारे 11 किमी हद्दीत पीएमआरडीएला मेट्रोचे खांब आणि स्टेशन उभे करण्याला परवानगी देण्याचा प्रताप शहर सुधारणा समितीने शुक्रवारी केला. त्यामुळे ही मंजुरी बेकायदा ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येत्या जानेवारीपासून हे काम सुरू होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)