मुंढवा - केशवनगर परिसरात नागरिकांकडून ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नदीपात्र सध्या कचऱ्याने भरून गेले आहे. यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. तसेच डासांची पैदास होऊन येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment