पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 6 दरम्यान सर्वच प्लॅटफॉर्म गलिच्छ असून ठिकठिकाणी अस्वच्छता प्रकर्षाने जाणवत असल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. मे 2017 रोजी पुणे रेल्वे स्टेशनला ए-1 कॅटेगरी यादीमध्ये देशातील नववे स्वच्छ स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, स्टेशनची सध्याची अवस्था पाहता याच स्टेशनला स्वच्छतेसाठी नववा क्रमांक मिळाला होता, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

No comments:
Post a Comment