पुणे – मेट्रो स्थानकासाठी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील 1,110 झाडे आणि पीएमआरडीए कार्यालयासाठी जवळपास 134 झाडे पुनर्रोपणाचा, त्यामधील काही झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर वृक्ष संवर्धन समिती बैठकीत अभूतपूर्व गोंधळ झाला. दरम्यान, या गोंधळात या प्रस्तावास काही अटींवर मान्यता दिल्याचे काही सदस्यांनी म्हटले आहे, तर काही सदस्यांनी या दोन्हींचे प्रस्ताव फेटाळून लावल्याचा दावा केला आहे.

No comments:
Post a Comment