चौफेर न्यूज – यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (2018-19) नीट (NEET) आणि सीईटी (CET) प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment