कात्रज (पुणे) : घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणारी आपली मुलं खरंच किती सुरक्षित आहेत, या प्रश्नावर प्रत्येक पुणेकराला गांभीर्याने विचार करायला लावणारी भयंकर घटना शुक्रवारी सकाळी पुण्यात घडली. महाविद्यालयातून घरी जाणारी मुलगी असो की, रस्त्यावरून फिरणारे आजोबा, तसेच घराच्या अंगणात मनमुराद खेळणारी तीन वर्षांची चिमुकली असो या सर्वांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हल्ला करून, त्यांचे लचके तोडले. यात सहा जण जखमी झाले आहेत. त्यात आजोबा आणि नातीचाही समावेश आहे.

No comments:
Post a Comment