Friday, October 26, 2018

शहरात 19 ठिकाणी फटाके विक्रीस मुभा

पुणे : शहरातील फटाके विक्रेत्यांना महापालिकेकडून वेगवेगळ्या 19 ठिकाणी फटाके विक्रीस मुभा देण्यात आली आहे. त्यात सुमारे 457 स्टॉल असणार असून त्याचा लिलाव शुक्रवारी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यंदाही म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी असणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षीपासून या जागेवर फटाके विक्रीस पोलीस आणि महापालिकेने मनाई कायम ठेवली आहे.

No comments:

Post a Comment