PUNE: All private luxury buses can cruise through the city’s ..
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Tuesday, October 2, 2018
पीएमपीच्या ‘एसी’ बसची दरकपात
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) एसी बसचे तिकीटदर सामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने, आता त्या बसचे दर कमी केले जाणार आहे. जिल्हा परिवहन प्राधिकरणाने हे दर कमी करण्यास नुकतीस मान्यता दिली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
गदिमांचे स्मारक कोथरूडमध्ये
'गदिमांना जाऊन चाळीस वर्षे होऊन गेली, पण इतक्या वर्षांत गदिमांच्या स्मारकासाठी केवळ जागा निश्चित झाली. ती जागा पूररेषेपाशी असल्याने वीट रचली गेली नाही. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षांत मात्र स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली असेल. गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांचे स्मारक कोथरूड येथे साकारण्यात येईल,' अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी केली. 'स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. आराखडा करण्याचे काम सुरू आहे,' असे त्यांनी सांगितले.
राज्यातील ‘पोलिओ’ लस सुरक्षित
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पोलिओ लसीत 'टाइप टू व्हायरस' आढळला असल्याने महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर करण्याचे राज्य सरकारने थांबविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिओ लस सुरक्षित असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
शहरातील पथदिवे धोकादायक
पुणे : शहरातील रस्त्यांवर नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने लावलेले पथदिव्यांचे खांब यमदूत बनून उभे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथदिव्यांमध्ये थेट वीज प्रवाह वाहत असून त्याला स्पर्श झाल्यास एखाद्याला जीव गमवावा लागणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेनेच गेल्या महिन्याभरात केलेल्या 76 हजार पथदिव्यांच्या तपासणीतून ही बाब उघड झाली आहे. त्यात 10 हजार पथदिवे आर्थिंग शिवायच सुरू असून अद्याप 60 हजारहून अधिक पथदिव्यांचे सर्वेक्षण सुरू असून त्यातही जवळपास तेवढेच विनाआर्थिंग आढळून येतील, असेही विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर्णतः बाधित 98 कुटुंबांचे पुनर्वसन
पुणे - उजवा मुठा कालवाफुटी दुर्घटनेत पूर्णतः बाधित झालेल्या 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सव्वाआठ कोटींची निविदा ‘करप्ट’
पुणे - महापालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा, या उद्देशाने सव्वाआठ कोटी रुपयांची नव्या संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर) जाळे विस्तारून कामकाज वेगवान केल्याचा दावा महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाने केला खरा. मात्र, ही प्रणाली कार्यान्वित होऊन जेमतेम सातच महिने झाली असताना तब्बल साडेपाच हजार कोटींच्या हिशेबाचा ‘डेटा’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. संगणक प्रणालीवर एवढा मोठा खर्च होऊन ती ‘करप्ट’ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रणालीच्या देखभालीसाठी महिन्याकाठी महापालिकेने तब्बल पाच लाख रुपये मोजले असल्याने या योजनेची निविदाही ‘करप्ट’ असावी, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
डीबीटी योजनेत 2 हजार 809 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर
पुणे – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी वैयक्तिच्या लाभाची योजना (डीबीटी) अंतिम टप्प्यात आली असून, आत्तापर्यंत 2 हजार 809 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर, अपात्र उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ही सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांनी केले आहे. दरम्यान, प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी सूचना देण्यात येणार असल्याचेही +*शेळके यांनी सांगितले.
विना अनुदानित सिलिंडर 59 रुपयांनी महागले
नवी दिल्ली – इंधन दरवाढीची छळ बसत असताना रविवारी अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपये 89 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे 499.51 पैशांना मिळणारा सिलिंडर आता 502.40 पैशांना खरेदी करावा लागणार आहे. तर विना अनुदानित सिलिंडर तब्बल 59 रुपयांनी महागले आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
Puneites can call cops to thank them for good work
After years of fielding bomb hoaxes and crank calls in the control room, the Pune police have been rather taken aback by the gratitude and goodwill showered on them by citizens in the last two months. Whether with regard to traffic initiatives, or steps taken for a quieter, more streamlined Ganeshotsav, the appreciation has been overwhelming
Subscribe to:
Posts (Atom)