Tuesday, October 2, 2018

सव्वाआठ कोटींची निविदा ‘करप्ट’

पुणे - महापालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा, या उद्देशाने सव्वाआठ कोटी रुपयांची नव्या संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर) जाळे विस्तारून कामकाज वेगवान केल्याचा दावा महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाने केला खरा. मात्र, ही प्रणाली कार्यान्वित होऊन जेमतेम सातच महिने झाली असताना तब्बल साडेपाच हजार कोटींच्या हिशेबाचा ‘डेटा’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. संगणक प्रणालीवर एवढा मोठा खर्च होऊन ती ‘करप्ट’ झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रणालीच्या देखभालीसाठी महिन्याकाठी महापालिकेने तब्बल पाच लाख रुपये मोजले असल्याने या योजनेची निविदाही ‘करप्ट’ असावी, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.  

No comments:

Post a Comment