Friday, June 22, 2018

पीएमपीच्या 50 बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) बसेसना गेल्या काही महिन्यांत आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे ठरवले होते. यासाठी प्रायोगिक तत्वावर “क्राफ्ट’ या संस्थेची निवड करण्यात आली. या कंपनीने पिंपरी डेपोतील बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट सुरू केले असून 50 बसेसचे काम पूर्ण झाले आहे.

No comments:

Post a Comment