Friday, June 22, 2018

बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससून रुग्णालयात

पुणे,दि.21- डीएसके समूहाला नियम डावलून कर्ज दिल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र मराठे यांच्यासह अन्य चार जणांना बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment