Monday, June 25, 2018

म्हाडाच्या घरांसाठीआज प्रारूप यादी

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) तीन हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीसाठी ३६ हजार ७६ जणांनी अर्ज भरले असून, सोमवारी (दि. २५) प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे. हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम यादी २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३० जून रोजी संगणकीय प्रणालीद्वारे सोडत होणार असून, सदनिका किंवा भूखंडासाठी निवड झालेल्या अर्जदारांना मोबाइलवर एसएमएसद्वारे आणि सूचनापत्र पाठवून माहिती कळविली जाणार आहे.

No comments:

Post a Comment