Wednesday, June 20, 2018

शहरातील वीजवाहिन्या अद्याप लटकलेल्याच…!

पुणे; दि. 19- स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या पुणे शहरातील महावितरणचा कारभार मात्र गचाळ झाला आहे, नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात महावितरण प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. मुख्य कार्यालयाने इन्फ्रा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला असतानाही महावितरण आणि महापालिका या दोन संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शहर आणि उपनगरातील तब्बल 70 टक्के वीजवाहिन्या अद्यापही लटकलेल्याच अवस्थेत आहेत, विशेष म्हणजे शहराच्या मध्यवस्तीत आणि झोपडपट्टयांच्या परिसरात ही परिस्थिती भयावह अशीच आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांमधील नागरिक ” डेंजर झोन’ मध्ये वावरत आहेत.
महावितरण प्रशासनात पुणे परिमंडल हे सर्वाधिक महत्वाचे परिमंडल समजले जात आहे, या परिमंडलाच्या माध्यमातून प्रशासनाला महिन्याकाठी सर्वाधिक महसूल मिळत असतो. त्यामुळेच पायाभूत यंत्रणा सक्षम करताना प्रशासनाच्या वतीने पुणे परिमंडलाला झुकते माप देण्यात आले होते, त्याशिवाय वीजटंचाईमुळे राज्यभरात लोडशेडिंग सुरु असताना प्रशासनाने शहराला भारनियमनमुक्त करुन वेगळी किमया साधली होती. त्याच धर्तीवर शहरातील लटकलेल्या वीजवाहिन्या काढून त्या भूमीगत करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता, त्यासाठी प्रशासनाने ” इन्फ्रा’ ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणली होती.

No comments:

Post a Comment