शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, त्याच्याशी संबंधित सर्व घटकांची इत्थंभूत माहिती संकलित करून त्याचा 'डेटाबेस' तयार करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी स्कूल बसची तालुकावार संख्या, प्रत्येक शाळेतील स्कूल बस व त्यांचा नोंदणी क्रमांक, चालक व सहवर्ती (अटेंडन्ट), परिवहन समिती स्थापन केल्याबाबत समितीच्या सदस्यांच्या नावासह शाळांचा अहवाल आणि खासगी वाहनांनी विद्यार्थी वाहतूक होत असल्यास त्या वाहनांची क्रमांकासह सर्व माहिती येत्या २६ जूनपर्यंत सादर करण्याची सूचना जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीने शिक्षण विभागाला केली आहे.
No comments:
Post a Comment