Wednesday, September 12, 2018

एक हजार घरांमधून विद्यार्थ्यांनी डेंगीची 24 उत्पत्तीस्थाने केली नष्ट

भवानीनगर (पुणे) : जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चिला जात असलेल्या सणसर डेंगी निर्मूलन मोहिमेस आज (ता. 11) सुरवात झाली. उद्या (ता. 12) ती भवानीनगरमधील तपासणीनंतर पूर्ण होणार आहे. आज दिवसभरात फक्त सणसर व गावच्या 12 वाड्या-वस्त्यांमधील 893 कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 2 हजार 163 कंटेनरची तपासणी केली. तब्बल 24 घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या. 

No comments:

Post a Comment