पोलीस बंदोबस्तात पालिका राबविणार मोहीम : वकिलांची फौजही तैनात
पुणे – महापालिकेकडून शहर डुक्करमुक्त करण्यासाठी आजपासून “डुक्करमुक्त पुणे मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पुढील महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून दहा स्वतंत्र पथके करण्यात आली असून, त्यात घनकचरा विभाग, अतिक्रमण विभाग आणि पोलिसांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त महापालिकेने ही मोहीम सुरू केल्यानंतर डुक्कर व्यावसायिक न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पालिकेने स्वतंत्र वकिलांची नियुक्ती केली असून त्यांना ही मोहीम सुरू असताना महापालिकेत उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक मोकाट डुकरांचा सुळसूळाट हडपसर भागात असल्याने या ठिकाणाहून ही मोहीम सुरू केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
No comments:
Post a Comment