कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत तसेच मानाचा पहिला गणपती आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाऐवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, अशी अख्यायिका आहे. राजमाता जिजाबाई या सन 1630मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पुण्यातील लाल महाल येथे वास्तव्यास आल्या होत्या. याच वर्षी महालाजवळ राहणाऱ्या विनायक ठक्कर यांच्या घराजवळ ही गणेशमूर्ती सापडली होती. जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893मध्ये सुरूवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.
No comments:
Post a Comment