Wednesday, September 12, 2018

पानशेत पूरग्रस्तांनो, जागा विकताना परवानगी आवश्‍यक

50 टक्के नजराणा भरण्याची अट कायम
पुणे – पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड मालकी हक्काने देण्यासाठी 1976 मधील रेडीरेकरनमधील दर ग्राह्य धरून भूखंडाची कनिश्‍चित करावी. तसेच मालकी हक्काने दिल्यानंतरही त्यांची विक्री करताना राज्य सरकारची मंजुरी आणि 50 टक्के नजराणा भरण्याची अट कायम ठेवावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे भूखंड मालकी हक्काने झाल्यानंतरही त्यांची विक्री करताना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आणि नजराणा भरणे जागा मालकांवर बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

No comments:

Post a Comment