सुशील कुलकर्णी, पुणे :पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये अनसिमेंटेड बायलॅटरल या पद्धतीने पूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. भारतात प्रथमच एकाच वेळी दोन्ही गुडघ्यावर या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.कोथरूड येथील ५८ वर्षाच्या सौ.अनघा जोशी या गेल्या ५ वर्षापासून गुडघा दुखीने त्रस्त होत्या. अनेक ठिकाणी उपचार करून देखील त्यांचे दुखणे कमी झाले नाही. शेवटी त्यांनी साईश्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याचे ठरवले. अनघा यांची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांच्या असे लक्षात आले की अनघा यांच्या हाडांची स्थिती उत्तम असून अनसिमेंटेड पद्धतीने पूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या उलट वृद्ध व कमकुवत हाडांच्या व्यक्तीवर या पद्धतीची शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे.तथापि, अनघा जोशी या प्रकरणात अपवाद होत्या.
No comments:
Post a Comment