पुणे : काही वर्षांपूर्वी स्पर्धा परिक्षांसाठी पुरेसी साधने उपलब्ध नव्हती. मात्र, आता इंटरनेट, स्पर्धा परिक्षा केंद्र, ग्रंथालयासह इतर अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कासेवाडी येथील स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घटन आयुक्त राव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कॉंग्रेसचे ग़टनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, महापालिका उपायुक्त माधव देशपांडे, सह महापालिका आयुक्त वैभव कडलख, नगरसेवक रफीक शेख, अजित दरेकर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment