शहरातील वाढती विकासकामे, वाहनांच्या सातत्याने वाढणाऱ्या संख्येचा फटका पुणेकरांच्या आरोग्याला बसत आहे. जल आणि वायू प्रदूषणाबरोबरच आता ध्वनिप्रदूषणही पुणेकरांच्या पाचवीला पुजल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांचा परिसर, नगर रस्ता, गर्दीचा उच्चांक करणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक असो की शांतता क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या ससून हॉस्पिटल परिसरासह संपूर्ण शहरभर ध्वनी प्रदूषणाने 'कळस' गाठल्याचे वास्तव समोर आले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यातून शहरातील शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आणि न्यायालयेही सुटली नसल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment