Tuesday, August 28, 2018

शहर भिक्षेकरीमुक्‍त करण्यासाठी पोलिस आयुक्‍त सरसावले

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये भिकार्‍यांचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे चित्र पहावयास मिळते. अपंग, लहान मुले, मुले कडेवर घेऊन भीक मागणार्‍या महिला चौकाचौकात पहावयास मिळतात. यापूर्वीही  पुणे भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी पोलिस, महापालिका व बालकल्याण विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, तो केवळ फार्स ठरल्याने चौकाचौकात भिक्षेकरी दिसून येत आहेत. अशा भिक्षेकर्‍यांवर पुणे पोलिस कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहेत. पोलिस ठाण्यांनी यासंदर्भात आपापल्या  हद्दीतील भिक्षेकर्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचा अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करण्यात येत आहे. मात्र, या भिक्षेकर्‍यांना भीक मागण्यास भाग पाडणार्‍यांचे रॅकेटही उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे

No comments:

Post a Comment