पुणे: गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे यापूर्वी बुजविण्यात आले असले, तरी त्यांची पुन्हा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी सूचना पथ विभागाने महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांना केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असून, त्यासाठी आवश्यक मालाचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले आहेत.
No comments:
Post a Comment