Wednesday, September 12, 2018

पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मंडळांचे मंडप बेकायदा

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, कमानी आणि रनिंग मंडपाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतरही शहरातील सत्तर टक्के मंडळांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही. गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप पडल्यानंतर आणि परवानगी देण्याची मुदत संपल्यानंतरही परवानगीची प्रक्रिया पालिकेकडून सुरू ठेवण्यात आली. असे असतानाही 1134 गणेश मंडळांनीच मंडपाच्या परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे शहरातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मंडळांनी बेकायदेशीर मंडप उभारल्याचे समोर आले आहे

No comments:

Post a Comment