पुणे - महापालिका आयुक्त सौरव राव यांनी महापालिकेच्या अनेक विभागप्रमुखांच्या शुक्रवारी सायंकाळी बदल्या केल्या. सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, उल्का कळसकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment