Saturday, September 1, 2018

गणेशमूर्तींवरचा जीएसटी रद्द झाल्याबद्दल आनंदोत्सव

पुणे - गणेशमूर्तींवरील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) राज्य शासनाने रद्द केला. त्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे. याबद्दल सिंहगड रस्त्यावरील संकल्प प्रतिष्ठान शिवसेना खडकवासला शाखेच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर देवस्थानसमोर नागरिकांना मोदक वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. "श्रीं'ची आरतीही या प्रसंगी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश गिरमे, समीर बडदे, राम तोरकडी, संग्राम जाधव, निखिल भालेराव, प्रशांत जाधव, भरत होलगे, संजय गायकवाड, सुधीर माताळे, विशाल वाघमारे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment