एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती समितीने सह शहर अभियंतापदी पदोन्नती दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) होणा-या विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, विधी समितीने तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे. महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक बैठक आज (शुक्रवारी) पार पडली. सभापती माधुरी कुलकर्णी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
No comments:
Post a Comment