PUNE: Questioning the traffic, feasibility, utility and impa ..
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Sunday, September 2, 2018
IISER Pune biologist among recipients of Shanti Swarup Bhatnagar Award
IISER Pune biologist among recipients of Shanti Swarup Bhatnagar Award
Saturday, September 1, 2018
गुजराती, राजस्थानी ‘अमृततुल्य’ला मराठी चहाची टक्कर
पृथ्वीतलावरचे अमृत असे चहाचे वर्णन केले जाते. दवे आणि पटेल यांची चलती असलेल्या अमृततुल्य व्यवसायामध्ये आता मराठी माणसांनी केवळ पाऊलच टाकले असे नाही, तर दिवसेंदिवस चहा व्यवसायातील मराठी टक्का वाढताना दिसून येत आहे. ‘आमची कोठेही शाखा नाही’, अशी पाटी अभिमानाने मिरवणाऱ्या पुण्यामध्ये चहा व्यावसायिकांच्या शाखांचे जाळे पसरले आहे.
वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतून ५६ कंपन्यांचा काढता पाय..
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि पन्नास लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केले आहे. कंपन्यांचे स्थलांतर असेच सुरू राहिले, तर आयटी पार्कची अवस्था रोजगाराच्या दृष्टीने बिकट होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत ६0 कोटीहून अधिक रुपयांची मान्यता
पुणे: महापालिकेच्या चालू वर्षीच्याअंदाजपत्रकात शहरातील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित असलेली ६० कोटीहून अधिक रुपयांची रक्कम प्रभागातील लहान-मोठय़ा कामांसाठी वळविण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने ६0 कोटी रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण पावणेतीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून ६0 कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळविण्यात आला आहे.
300 विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वर्ग
पुणे : महापालिकेच्या 2018-19मधील अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली तब्बल 300हून अधिक वेगवेगळ्या विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वळविण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभांमध्ये तब्बल 270हून अधिक प्रस्तावांद्वारे सुमारे 65 कोटींचा निधी वळविण्याचा विक्रमच सत्ताधारी भाजपने केला आहे.
हडपसरमधील दोन रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाचे आयुक्तांचे आदेश
हडपसर : हांडेवाडी व महंमदवाडीकडे जाणार्या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण केल्याशिवाय रेल्वे फाटकाच्या भूमिगत रस्त्याचे काम केल्यास वाहतुकीवर त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही, तेव्हा फाटकापासून जाणार्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण करण्याचे काम करण्याची गरज आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यासाठी कालबद्धता आखून देऊन त्यानुसार अधिकार्यांनी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे असे आदेश दिले. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांसमवेत बुधवारी (दि.29) बैठक घेतली. यावेळी नगरसेवक प्रमोद भानगिरे, संगीता ठोसर, तानाजी लोणकर, विजय देशमुख, समीर तुपे, अमोल हरपळे उपस्थित होते.
येरवडा कारागृहाला ऐतिहासिक तटबंदी
पुणे : देशातील महत्त्वाचे कारागृह असलेल्या येरवडा कारागृहाला आता ऐतिहासिक तटबंदी करण्यात येणार आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील बाजूस एक भिंत उभारण्यात येत असून तिला ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी दिली.
९० हजार तरुणांना पैसे परत मिळणार?
पुणे : वाहक, चालक, क्लिनर आणि वर्कशॉपमधील अन्य पदांसाठी भरतीचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने दोन वेळा घेतला होता. पहिल्यांदा 2012मध्ये आणि त्यानंतर 2016मध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने साडेआठ हजार पदांसाठी अर्ज मागविले होते. भरतीच्या नावाखाली तब्बल 90 हजार बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्या ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाच्या हे प्रकरण अंगलट आले आहे. हा महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर हात झटकणार्या प्रशासनाने उशिरा का होईना पण याची जबाबदारी घेतली आहे. या तरुणांनी न्यायालयाचे दार ठोठाविण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना ही रक्कम परत करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यसभांना दांडी मारल्यास कारवाई
पुणे : महापालिकेच्या मुख्यसभांना नगरसेवकांकडून ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’ अंतर्गत शहरातील समस्यांवर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, त्यावेळी संबंधित विभाग प्रमुख उपस्थित नसल्याने प्रशासनाकडून नगरसेवकांना उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांकडून तसेच महापौरांकडूनही प्रशासनाला धारेवर धरले जात असल्याने यापुढे महापालिकेच्या प्रत्येक विभाग प्रमुखाने मुख्यसभेला उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी
दिले आहेत.
दिले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)