Saturday, September 1, 2018

मुख्यसभांना दांडी मारल्यास कारवाई

पुणे : महापालिकेच्या मुख्यसभांना नगरसेवकांकडून ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’ अंतर्गत शहरातील समस्यांवर प्रश्‍न उपस्थित केले जातात. मात्र, त्यावेळी संबंधित विभाग प्रमुख उपस्थित नसल्याने प्रशासनाकडून नगरसेवकांना उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांकडून तसेच महापौरांकडूनही प्रशासनाला धारेवर धरले जात असल्याने यापुढे महापालिकेच्या प्रत्येक विभाग प्रमुखाने मुख्यसभेला उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी
दिले आहेत.

मेट्रो, कॅब आणि पीएमपीसाठी एकच तिकीट

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टिम’ ही यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.

ससूनच्या इमारतीसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

पुणे - ससूनच्या अकरा मजली इमारतीच्या अपूर्ण कामाबाबत राज्य सरकारच्या वतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना दिली आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजि

रिक्षापेक्षा वेगाने धावते मीटर...

पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स कॉर्नर ते शनिवारवाडा दरम्यानच्या सुमारे साडेतीन- चार किलोमीटरच्या अंतराचे रिक्षाचे भाडे किती व्हावे... चक्क 184 रुपये. प्रवाशाने मीटरच्या वैधतेबाबत शंका उपस्थित केल्यावर अवघ्या तीस रुपयांत तडजोड करण्यात आली अन्‌ रिक्षाचालक दुसरा प्रवासी शोधण्यासाठी पुढे गेला.... शहरातील अनेक रिक्षांमधील मीटर हे रिक्षापेक्षा वेगाने धावताना दिसत असताना, "तक्रार आलेली नाही' म्हणत "आरटीओ'चे पुणे कार्यालय त्याकडे काणाडोळा करीत आहे. 

मतदार यादीतून ५४ हजार नावे वगळली

पुणे - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष अभियानानंतर शनिवारी (ता. १) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या मतदार यादीमधून ५४ हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत, तर २० हजारांहून अधिक तरुण मतदारांची नावनोंदणी करण्यात आली आहे.

गणेशमूर्तींवरचा जीएसटी रद्द झाल्याबद्दल आनंदोत्सव

पुणे - गणेशमूर्तींवरील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) राज्य शासनाने रद्द केला. त्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे. याबद्दल सिंहगड रस्त्यावरील संकल्प प्रतिष्ठान शिवसेना खडकवासला शाखेच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर देवस्थानसमोर नागरिकांना मोदक वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. "श्रीं'ची आरतीही या प्रसंगी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश गिरमे, समीर बडदे, राम तोरकडी, संग्राम जाधव, निखिल भालेराव, प्रशांत जाधव, भरत होलगे, संजय गायकवाड, सुधीर माताळे, विशाल वाघमारे उपस्थित होते. 

पुण्यात पालिका आयुक्तांचा बदल्यांचा दणका

पुणे -  महापालिका आयुक्त सौरव राव यांनी महापालिकेच्या अनेक  विभागप्रमुखांच्या शुक्रवारी सायंकाळी बदल्या केल्या. सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, उल्का कळसकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.

पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांची कामे लवकर व्हावी - सुप्रिया सुळे

बारामती शहर -  पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानके आणि गावांमध्ये तसेच लोहमार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, प्लॅटफॉर्म दुरुस्ती आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेकडे केली आहेत.

तलाव, पाझर तलावात पाणी सोडण्याची खडकवासला कालव्याद्वारे तरतुद नाही

खडकवासला : खडकवासला प्रकल्पातील लाभक्षेत्र व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याची तरतूद आहे. परंतू लाभ क्षेत्रातील लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलावात पाणी सोडण्याची खडकवासला कालव्याव्दारे तरतुद नाही. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर

पुणे - ‘‘पीएमपीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांची वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा पाच कोटी रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, पीएमपीचा वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे,’’ अशी माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.