Sunday, October 21, 2018

आंदोलने, दाव्यांत पुणेकर कोरडेच!

निवडणुका आल्या की राजकीय पक्षांच्या हालचाली वाढतात. विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांमधील दोष प्रकर्षाने जाणवतात आणि जनतेचे केवळ आपणच कसे वाली आहोत, याची जाणीवही होते. सत्ताधारी पक्षास गेल्या चार-साडेचार वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेच्या जीवनात कसा प्रचंड बदल होऊन ‘रामराज्य’ अवतरले आहे याचा भास होतो. या सर्वांत बिचाऱ्या नागरिकांना मात्र पावसाळा संपून महिना झाला नाही तोच हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. पुणेकरांचेही नेमके असेच झाले आहे.

गृहनिर्माण संस्थांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी

पुणे - सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यांनी निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

सत्ताधारी नगरसेवकांचाच नाराजीचा सूर

पुणे - ‘‘प्रभागांमधील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक छोटे प्रकल्पही रखडले आहेत, एकाच कामासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे, लोकांना काय उत्तरे द्यायची?’’ ही गाऱ्हाणी विरोधी पक्षीय नव्हे, तर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची आहेत. आज या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कानावर घालण्यात आल्या. एक-दोन नव्हे तर भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे कामकाजाबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. सत्ताधाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे नाराजी मांडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  

स्मार्ट कार्ड होणार शोभेचे ?

पुणे : वाहनाच्या नोंदणीसाठीचे स्मार्ट कार्ड आले. त्यासाठी नागरिकांचे प्रती कार्ड किमान 200 रुपये खर्च झाले... पण 12 वर्षांनंतरही परिवहन खात्याकडून स्मार्ट कार्ड रीडर पोचलेच नाही. त्यामुळे आता ऍपमधूनच स्मार्ट कार्ड रीड करता येईल का?, या प्रस्तावाची चाचपणी परिवहन खाते करीत आहे. दरम्यान, स्मार्ट कार्ड लवकरच हद्दपार होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

विमानतळासमोर होर्डिंगवर हातोडा

वडगाव शेरी : विमानतळासमोरील नवीन रस्त्यावर आणि खराडीतील अनधिकृत होर्डिंगवर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली. यासाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता. ही होर्डिंग रस्त्यालगत असल्याने सुरक्षेचे उपाय करण्यासोबतच मोठ्या क्रेनचीही मदत घेण्यात आली. 

विकासकामांना कात्री लागणार ; महापालिकेचे उत्पन्न घटल्याचा परिणाम

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्‍यता कमी दिसत असून, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामांना पुढील काळात कात्री लागण्याची चिन्हे आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यानंतर आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असून, त्याचाही विकासकामांवर परिणाम होणार आहे. 

खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी दरवाढ

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मनमानीपणे प्रवासी भाड्यांमध्ये दरवाढ केली आहे. वास्तविक, ट्रॅव्हल्स चालकांना तिकीट दरांच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. तरीही, दसरा व दिवाळीच्या तोंडावर तिकीट दरांमध्ये दुप्पट ते पाचपट वाढ केली जात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला लगाम घालावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – आयुक्त

पुणे  : काही वर्षांपूर्वी स्पर्धा परिक्षांसाठी पुरेसी साधने उपलब्ध नव्हती. मात्र, आता इंटरनेट, स्पर्धा परिक्षा केंद्र, ग्रंथालयासह इतर अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कासेवाडी येथील स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घटन आयुक्त राव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कॉंग्रेसचे ग़टनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, महापालिका उपायुक्त माधव देशपांडे, सह महापालिका आयुक्त वैभव कडलख, नगरसेवक रफीक शेख, अजित दरेकर यावेळी उपस्थित होते.

स्मार्ट यांत्रिकीकृत सफाईच्या पथदर्शी प्रकल्पास प्रारंभ

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट यांत्रिकीकृत सफाईचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. विद्यापीठ ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी नजीकचा बस थांबा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा वाहनाद्वारे यांत्रिकीकृत सफाईला प्रारंभ करण्यात आला. योग्य अत्याधुनिक उपकरणे वापरून रस्त्यांची साफसफाई करण्याचे आदर्श उदाहरण निर्माण करणे आणि नंतर त्याचा सर्वत्र वापर वाढविणे हा उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Saturday, October 20, 2018