Friday, December 14, 2018

CCTVs to beef up PMC's garbage surveillance

The Pune Municipal Corporation (PMC), despite its best effor

Activists want Salim Ali sanctuary free of tree-cutting, encroachments

PUNE: Spread over 20 acres of lush green land along the Mula-Mutha river near Kalyaninagar, Dr Salim Ali Biodiversity Park is popular among bird-watchers and environmental activist as a nesting heaven for birds of many feathers.

Work on Pune metro’s underground stretch to begin next week

The much-delayed underground work on Corridor One of the Pune Metro project, from Pimpri to Swargate, is all set to take off from next week. The Metro will run underground for a five kilometre stretch, from the Agriculture College grounds to Swargate.

IISER scientist steps down over ‘illegal tree felling’, institute says charges baseless

Senior biologist Professor Milind Watve, who recently resigned from the Indian Institute of Science, Education and Research (IISER), Pune, has alleged that over 500 fully grown trees on the campus were felled illegally to facilitate the construction of a road and other work on campus.

समाविष्ट गावांसाठी प्रत्येकी शंभर कोटींचे अनुदान द्या

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये विकासकामे आणि मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक गावाला शंभर कोटी याप्रमाणे अकरा गावांसाठी अकराशे कोटी रुपयांचे अनुदान द्यावे. महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकातही या गावांसाठी तरतूद करण्यात यावी, अन्यथा मार्चमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

महर्षी कर्वेंचा पुतळा अवतरला, पण...

कोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकामध्ये अवतरला. मात्र स्मारकाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

दुकाने थाटली नोंदीविना

येरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. अशा नोंदणीची एकूण संख्या केवळ १९०० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्याचे गांभीर्य ना लोकप्रतिनिधींना आहे ना प्रशासनाला! 

गाळ नव्हे पैशांचाच उपसा

पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला. त्यावर आपापल्या प्रभागांमधील गाळ काढण्याचे प्रस्ताव त्यांनी धपाधप धाडले अन्‌ तत्पर प्रशासनानेही ते चुटकीसरशी मंजूर करत गाळउपसा मोहीम आखली. यासाठी तब्बल ३८ कोटी रुपये ओतल्यानंतरच तो गाळ निघाला. त्यापैकी एक-दोन कामेही आपण पाहिली नसावीत, कारण ही मोहीम फक्त कागदोपत्रीच फत्ते करण्यात नगरसेवक अन्‌ अधिकारी यशस्वी झाले आहेत.

‘पीएमआरडीए’च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते?

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्‍यता आहे.
पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा येत्या मंगळवारी (दि.18) प्रस्तावित आहे. बालेवाडी स्टेडियम येथे हा कार्यक्रम प्रस्तावित असून या दौऱ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.

अनधिकृत बोर्ड, फ्लेक्‍स, जाहिराती नकोच

पुणे – शहरात अनधिकृत बोर्ड, फ्लेक्‍स, जाहिराती लावणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिराती लावल्या जाणार नाहीत, यासाठी कार्यकर्त्यांना समज द्यावी, असे पत्र महापालिका प्रशासनाने सर्व नगरसेवक, राजकीय पक्ष तसेच आमदार आणि खासदारांना दिले आहे.

देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर दिल्ली हायकोर्टाची बंदी

नवी दिल्ली – देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला असून सक्तीने राबविण्याचा आदेश दिला आहे.

पुणेकरांनी भरला 9 लाखांचा दंड

पुणे – शहरात रस्त्यावर थुंकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई सुरूच असून महापालिकेने या कारवाईत आतापर्यंत तब्बल 4 हजार 61 पुणेकरांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 9 लाख 6 हजार 80 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी “स्मार्ट सिटी’चा पुढाकार

पुणे – महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेट कॉर्पोरेशन कडून जाहिरात फलकांद्वारे उत्पन्नवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरातील महापालिकेच्या मिळकती तसेच जागांमधे जाहिरात फलक उभारले जाणार आहेत.

Maharashtra mulls police station for Baner

PUNE: The state government has suggested a new police statio .. 

Citizens’ WhatsApp groups highlight issues

PUNE: The division-level WhatsApp groups created by Pune Tra .. 

शुल्क वाढले, वापर घटला

सायकलचे शहर अशी शहराची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावरील सायकल योजनेला प्रारंभ करण्यात आला.

आधी जमीन, मगच काम

कोथरूडमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी ८० टक्के भूसंपादन झाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल, असे सांगणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेपुढे आता १०० टक्के भूसंपादनाची नवी अट  ठेवली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाचा मुहूर्तही लांबणीवर पडणार असून नव्या वर्षांत कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी

पुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे दर्शनच्या दोन बसपैकी एक बस आठवड्यातून चार दिवस बंद करण्यात आली आहे.

Friday, December 7, 2018

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी संयुक्त मोजणीला सुरुवात

शहरातील दोन मेट्रो मार्गिकांप्रमाणे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्याच्या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि टाटा-सिमेन्स यांच्यातर्फे मेट्रो मार्गिकेसाठी संयुक्त मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर विविध टप्प्यांत हे मोजणीचे काम सुरू असून, नेमक्या किती आणि कोणत्या जागा आवश्यक आहेत, हे यातून स्पष्ट होणार आहे.

‘बालगंधर्व’ पाडणार

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात बहुमानाचे स्थान असलेली आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेली बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तिथे सर्व सुविधांनी युक्त असे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागविले आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पुणेकरांच्या ‘शून्य प्रतिसादा’ने निवडणूक अधिकारी अचंबित!

जागरूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांनी ‘शून्य प्रतिसादा’चा वेगळाच प्रत्यय निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे आणि या ‘शून्य प्रतिसादा’ने निवडणूक अधिकारीही अचंबित झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीत स्वत:चे नाव आहे ना, पत्ता वगैरे अन्य तपशील बरोबर आहेत ना याची खातरजमा करून घ्या, तसेच काही सूचना, तक्रारी असल्यास त्या नोंदवा, या आवाहनाला पुणे आणि पिंपरीतून शून्य प्रतिसाद मिळाला आहे. याउलट, ग्रामीण भागातून ७०० हरकती-सूचना दाखल झाल्या आहेत.

माहिती फलक बंधनकारकच

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून सुरू असलेल्या प्रत्येक कामाचे माहिती फलक आता कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकराक असणार आहे. हे फलक लावण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांच्या करातून महापालिकेचे विकासकामे होत असतात. या कामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी अशाप्रकारचे फलक लावण्यात यावेत, तसेच ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करावी, अशा सूचना दिल्याचे मुळीक यांनी सांगितले.

कोणी चिल्लर घेता का चिल्लर

पुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक यांची बैठक घेऊनही या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. या प्रश्‍नातून मार्ग काढण्याची खासदार अनिल शिरोळे यांची घोषणा हवेतच विरली आहे.

विद्यापीठात रंगणार युवास्पंदन महोत्सव

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये येत्या १९ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘युवास्पंदन - आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव २०१८’ आयोजित केला आहे. 

“एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचा विसर!

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीचा “एल ऍन्ड टी’ कंपनीने “सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार केला आहे. मात्र, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.

पालिका शाळांतील ६१ टक्के मुलांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा

पुणे – महापालिकेकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत गेल्या महिनाभरात साडेसात हजार मुलांच्या खात्यात थेट “डीबीटी’ अर्थात थेट लाभार्थीच्या बॅंक खात्यात योजनेद्वारे शिष्यवृत्ती जमा करण्यात आली आहे.

Kondhwa pushes for smart future

Public participation plays a key role in getting civic probl .. 

Already in top 10, PMC appoints private agency to get better rank in Swachh survey

This year, the Pune Municipal Corporation (PMC) managed to break into the top 10 of the ‘100 cleanest cities’ in India, as judged by the Swachh Survekshan, a survey under the Union government’s flagship Swachh Bharat Mission. The civic body was at the 11th position in 2016 and had slipped to the 13th place in 2017.

धक्काबुक्कीच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे १०० ‘बॉडी कॅमेरे’!

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर भर चौकात हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. यंदाही वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील १७ प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी ‘बॉडी कॅमेरे’ दिले आहेत. वाढत्या धक्काबुक्कीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून आणखी १०० ‘बॉडी कॅमेरे’ खरेदी करण्यात येणार आहेत.

जिल्हा न्यायालयात 15 पासून ई-पेमेंट सुविधा

पुणे - पुणे जिल्हा न्यायालयात 15 डिसेंबरपासून "ई पेमेंट'ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे, अशी सुविधा देणारे पुणे जिल्हा न्यायालय देशातील पाहिले न्यायालय असणार आहे. या सुविधेअंतर्गत दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन भरण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. कोर्ट फी, न्यायालयीन कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती, दंडाची रक्कम, न्यायालयाच्या आदेशानुसार पोटगीची रक्कम असे सर्व पैसे भरण्याचे व्यवहार ऑनलाइन करता येणार आहेत. 

‘नाईट’ नाही, आता “दिवस-रात्र शेल्टर’

पुणे – प्रवासानंतर शहरात रात्री उशिरा येणाऱ्या आणि रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली “नाईट शेल्टर’ आता “दिवस-रात्र शेल्टर’ असणार आहेत. ही “शेल्टर’ दिवसाही सुरू ठेवावी, याबाबत राज्य शासनाने महापालिकेस सूचना केल्या आहेत.

सीएनजी पाहिजे, तर थकबाकी भरा

पुणे – आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर (पीएमपी) आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे 34 कोटींचे बिल पीएमपीने थकविले असून ते तत्काळ भरण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या अडचणी वाढल्या आहेत.

श्‍वानाने रस्त्यावर शौच केल्यास मालकास दंड

पुणे – रस्त्यावर पाळीव श्‍वानाला अर्थात कुत्र्याला फिरवण्यासाठी नेत असाल, तर तुमच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने सकाळी किंवा रात्री रस्त्यावर शौचास आणल्यास किंवा कुत्र्याने शौच केल्यास जागेवर 500 रुपये दंड कुत्रामालकाला द्यावे लागणार आहेत. गुरूवारपासून या कारवाईला सुरूवात केली जाणार आहे.

App based auto rides or regular auto rides?

For well over a decade now, commuters across Pune have lamen

स्मार्ट पदपथांवर विक्रेते, भिक्षेकऱ्यांचे बस्तान

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुण्याचे स्मार्ट पदपथ मात्र चौकाचौकात फुगे, खेळणी विकणारे विक्रेते आणि भिक्षेकऱ्यांनी व्यापल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक पदपथांवर या विक्रेत्यांनी आणि भिक्षेकऱ्यांनी बस्तान बसविले आहे. इतकेच नव्हे तर, रात्री झोपण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठीही पदपथांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पदपथ नक्की कोणासाठी, असा सवाल उपस्थित झाला आहे.

‘सवाई’ पाठोपाठ अन्य महोत्सवांचेही स्थलांतर

अभिजात संगीतामध्ये जगभरात नावाजल्या गेलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’पाठोपाठ शहरातील अन्य महोत्सवांचा डेरा दुसरीकडे हलविण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे मैदान यंदापासून केवळ क्रीडाविषयक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे सवाई महोत्सवानंतर होणाऱ्या तीन महोत्सवांच्या आयोजकांना स्थळ बदलण्यास भाग पडले आहे.

समान पाणी योजनेला सत्ताधाऱ्यांचाच हरताळ

पुणे – खासगी मोबाईल कंपन्यांच्या केबल खोदाईच्या दरांचे कारण पुढे करत महापालिकेने चक्‍क समान पाणी योजनेचे काम थांबविले असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासनाने हे काम देण्यात आलेल्या कंपनीस सत्ताधाऱ्यांची खोदाईसाठी परवानगी घेऊन या? असे सांगत हे काम थांबविल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

होर्डिंग दुर्घटनेची चौकशी बासनात

पुणे - मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने होऊनही दोषींवर कारवाईच काय, पण साधी चौकशीही मध्य रेल्वेकडून गांभीर्याने केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. मात्र, त्यांची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशीच गुंडाळली जात असल्याचे रेल्वेच्या कारभारावरून दिसून आले आहे. या घटनेत चार जणांचा जीव गेल्यानंतरही रेल्वेच्या पुणे विभागाची बेफिकिरी उघड होताच प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे थातूरमातूर उत्तर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिले. 

पीएमपी बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर

पुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६ कोटी १७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

Tuesday, December 4, 2018

Pune’s air becomes ‘toxic’

The city reported ‘very poor’ levels of PM10 (atmospheric particulate matter (PM) that have a diameter of 10 micrometers) and PM 2.5 in Lohegaon, Hinjewadi, Shivajinagar and Katraj after it crossed the permissible limits (stated below) as the mercury dipped to 11.3 degrees Celsius on Tuesday morning.

Citizens can inspect govt records under RTI

MUMBAI: Residents of Maharashtra can now inspect government  .. 

Breaking traffic rules in Hinjewadi IT park: Traffic police to press IT firms for action against techies

Mahesh Bagul was slapped with a fine of Rs 5,200 last week after he was caught driving on the wrong side, among other violations, while heading to his office at the Rajiv Gandhi Infotech Park in Hinjewadi. Like Bagul, techies working in Hinjewadi who are found flouting traffic rules repeatedly are now unlikely to be let off for the violations. Besides, the traffic department of Pimpri Chinchwad police plans to press their employers to take action against them.

FDA set to crack whip on food aggregators: Girish Bapat

The State Food and Drug Administration (FDA) is mulling action against top food aggregator portals such as Swiggy, Foodpanda, Zomato and Uber Eats after it found that as many as 122 food establishments from where these aggregators delivered food to customers had violated safety norms.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियम धाब्यावर!

स्वच्छ सर्वेक्षणात ‘अव्वल’ ठरण्यासाठी नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करण्याबरोबरच महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी आता नियमच धाब्यावर बसविल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. तातडीचे काम या नावाखाली निविदा प्रक्रिया न राबविता  ‘केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला स्वच्छ सर्वेक्षणासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून तीन महिन्यांसाठी महापालिका या कंपनीवर ३५ लाखांची उधळपट्टी करणार आहे.

मुठा नदी सुधारणेसाठी ३१ कोटीचा निधी महापालिकेकडे सुपूर्द

पुणे : मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ३१ कोटी७५ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.

शहरातील पदपथांवर 77 हजार अडथळे; नागरिकांची गैरसोय

पुणे : महावितरणचे फीडर पिलर्स, डीपी बॉक्स, केबल्स, स्वच्छतागृहे, खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांची अतिक्रमणे, पीएमपीचे बसथांबे असे 77 हजार अडथळे पदपथावर असल्याचे महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यापैकी 70 टक्के अडथळे महावितरणच्या डीपी आणि फीडर पिलर्सचे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. हे अडथळे अद्याप दूर झाले नसल्याने पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. पदपथावरील अडथळे दूर करण्यासंदर्भात महावितरणसोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

पुणे-लोणावळादरम्यान दोन लोकल पुन्हा सुरू

पुणे - पुणे-लोणावळा दरम्यान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे चार रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. त्यातील पुणे स्थानकातून १२.१५ वाजता सुटणारी लोकल आणि लोणावळा येथून २.५० वाजता सुटणारी लोकल पुन्हा सुरू केल्या आहेत.

नद्यांतून काढला ७ टन कचरा

पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे.  ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला. 

#प्रश्‍नदिव्यांगांचे : व्हीलचेअरचा ‘मार्ग’ अवघड

पुणे - सार्वजनिक स्वच्छतागृहे, ऐतिहासिक स्थळे, पर्यटनस्थळे, भुयारी पादचारी मार्ग, एटीएम आदी अनेक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अद्यापही दिव्यांगांना संघर्ष करावा लागत आहे. कायदा असूनही शासकीय कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. पदपथांवरील अतिक्रमणे आणि अडथळ्यांमुळेही व्हीलचेअरचा मार्ग अवघड झाला आहे. 

गोवर, रुबेलाची लस सुरक्षित

पुणे - राज्यातील ४९ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या चार दिवसांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस देण्यात आली. यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला लसीमुळे त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

रेल्वे रुग्णालयामध्ये डायलिसिसची सुविधा

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे रुग्णालयामध्ये किडनीच्या रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा सुरू केली आहे. कोथरूड डायलिसिस सेंटर आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार शनिवारी (ता. १) ही सेवा रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या कराराअंतर्गत रुग्णालयामध्ये तीन डायलिसिसच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत.

तळजाई टेकडी परिसरात नागरिकांचा मॉर्निंग वॉक

शहरातील थंडीचा कडाका वाढत असून, सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तळजाई टेकडी परिसरात तरुण-तरुणीच नव्हे, तर चाळिशीपुढील नागरिक गर्दी करत आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारे फिटनेसप्रेमी प्रसन्न वातावरणात ताजेतवाने होत आहेत.

#PMCHospital रुग्णालयातील सुविधा केवळ फलकावरच!

रामवाडी : "इथे सोनोग्राफी, नेत्र-रक्त-लघवी तपासणी मोफत केली जाईल.'...रुग्णालयाबाहेरचा हा फलक वाचून कोणाही रुग्णाला नक्कीच हायसं वाटेल; पण प्रत्यक्षात रुग्णालयात पाऊल ठेवताच यातील एकही सुविधा इथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येईल, तेव्हा... होय, अगदी अशीच परिस्थिती आहे महापालिकेच्या वडगाव शेरीतील मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे दवाखान्यातील. यामुळे या परिसरातील रुग्णांबरोबरच गर्भवतींना अन्य रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. 

दुष्काळग्रस्तांचे लोंढे पुण्यात

पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. 

“बीआरटी’ ई-बस शहरात दाखल

पुणे – शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी येऊ घातलेल्या एका इलेक्‍ट्रिक बसेसची ट्रायल नुकतीच पार पडली. 9 मीटर लांबीची ही बस होती. यानंतर आता बीआरटी मार्गावरून धावणारी 12 मीटर लांबीची ई-बस देखील दाखल झाली असून आजपासूनच (दि.4) या बसची ट्रायल होणार आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जन्मापासूनच त्यांच्या नशिबी “स्ट्रीट चिल्ड्रन’चे जगणे

पुणे – पुणे महापालिका आणि “रेनबो फाउंडेशन’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून शहरात 10 हजार 427 “स्ट्रीट चिल्ड्रन’ संख्या समोर आली आहे. यात आणखी एक बाब धक्कादायक आहे. भीक मागणे किंवा रस्त्यांवर वस्तू विक्रीसाठी वापर करण्यात येणाऱ्या सर्वाधिक मुलांचा वयोगट हा चार ते सहा वर्षे आहे. एवढेच नव्हे तर दहा दिवसांच्या बाळापासून ते अठरा वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांचाही यात समावेश आहे.

आयुक्तांचे आदेश वाऱ्यावर

पुणे – महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्‍स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन 2 दिवस झाले असतानाच प्रत्येक चौकात अशा जाहिरातींना उत आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सलग सुट्ट्या लक्षात घेऊन हे जाहीरात फलक रातोरात उभारले जात आहेत.

HC: When will Centre appoint Pune NGT chief?

The Bombay high court on Friday asked the Union government to spell out when it would fill the vacancy of chief of National Green Tribunal (west zone) headquartered in Pune.

प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका कधी मिळणार?

पुणे – शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात निकालाच्या उत्सूकतेमुळे नागरिकांची बी.पी. वाढणे, भोवळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मागील महिन्यात तर कामाच्या ताणाने एक पोलीसच भोवळ येऊन पडला होता. या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयात प्राथमिक उपचार केंद्र कधी होणार, न्यायालयात कायमस्वरुपी रुग्णवाहिका कधी मिळणार हा, प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक संकपाळ असताना 2012 मध्ये याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत आहे.

विद्यापीठात आता २४ तास वैद्यकीय उपचारांची सुविधा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आता २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करून विद्यापीठाने आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेतले आहे. अद्ययावत आरोग्य केंद्राचे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात उद्घाटन करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

आपत्तीग्रस्तांना पालिकेकडून १९ लाख रुपयांची मदत

पुणे - पाटील इस्टेट शेजारील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ९० पेक्षा अधिक झोपड्या जळून सहाशेपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तातडीची मदत म्हणून महापालिकेने सुमारे १९ लाख रुपये तत्काळ मंजूर केले आहेत.  प्रशासनाकडून ७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

एनडीएच्या १३५व्या तुकडीतून २६१ विद्यार्थी देशसेवेसाठी सज्ज

पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले. 

पुणे शहरात उभारणार १०० स्मार्ट बसथांबे

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून शहरात विविध भागांत १०० ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नवे बसथांबे एका महिन्यात उभारण्यात येणार आहेत. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या जागेवर नवे थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यातील सहा थांब्यांचे लोकार्पण गुरुवारी झाले.  

पीएमआरडीए मेट्रोच्या कामाला शहर सुधारणा समितीची मंजुरी

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) शुक्रवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या हद्दीत या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 

पालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प रुळावर

पुणे – पालिकेच्या 101 शाळांमध्ये ई-लर्निंग ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. 31 शाळांमध्ये क्‍लासरूम सुरू करण्यात आले आहेत. हे काम देण्यात आलेल्या बीएसएनएल कंपनीस हे काम करण्यासाठी जून-2018 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर-2018 उजाडला आहे. त्यामुळे 21 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा प्रकल्प अखेर रुळावर आला आहे.

37/1 ची कारवाई न करताच मेट्रो खांब उभारणी : बेकायदा ठरण्याची शक्‍यता

पुणे – महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आखणी (37/1 ची कारवाई) न करताच महापालिकेच्या सुमारे 11 किमी हद्दीत पीएमआरडीएला मेट्रोचे खांब आणि स्टेशन उभे करण्याला परवानगी देण्याचा प्रताप शहर सुधारणा समितीने शुक्रवारी केला. त्यामुळे ही मंजुरी बेकायदा ठरण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. येत्या जानेवारीपासून हे काम सुरू होणार आहे.