पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले.
No comments:
Post a Comment