Tuesday, December 4, 2018

रेल्वे रुग्णालयामध्ये डायलिसिसची सुविधा

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे रुग्णालयामध्ये किडनीच्या रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा सुरू केली आहे. कोथरूड डायलिसिस सेंटर आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार शनिवारी (ता. १) ही सेवा रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या कराराअंतर्गत रुग्णालयामध्ये तीन डायलिसिसच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment