कोथरूडमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी ८० टक्के भूसंपादन झाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल, असे सांगणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेपुढे आता १०० टक्के भूसंपादनाची नवी अट ठेवली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाचा मुहूर्तही लांबणीवर पडणार असून नव्या वर्षांत कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment