पुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक यांची बैठक घेऊनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. या प्रश्नातून मार्ग काढण्याची खासदार अनिल शिरोळे यांची घोषणा हवेतच विरली आहे.
No comments:
Post a Comment