Tuesday, December 4, 2018

विद्यापीठात आता २४ तास वैद्यकीय उपचारांची सुविधा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आता २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करून विद्यापीठाने आरोग्य सुविधांसाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेतले आहे. अद्ययावत आरोग्य केंद्राचे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात उद्घाटन करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

No comments:

Post a Comment