बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर भर चौकात हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. यंदाही वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील १७ प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी ‘बॉडी कॅमेरे’ दिले आहेत. वाढत्या धक्काबुक्कीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून आणखी १०० ‘बॉडी कॅमेरे’ खरेदी करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment