पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला. त्यावर आपापल्या प्रभागांमधील गाळ काढण्याचे प्रस्ताव त्यांनी धपाधप धाडले अन् तत्पर प्रशासनानेही ते चुटकीसरशी मंजूर करत गाळउपसा मोहीम आखली. यासाठी तब्बल ३८ कोटी रुपये ओतल्यानंतरच तो गाळ निघाला. त्यापैकी एक-दोन कामेही आपण पाहिली नसावीत, कारण ही मोहीम फक्त कागदोपत्रीच फत्ते करण्यात नगरसेवक अन् अधिकारी यशस्वी झाले आहेत.
No comments:
Post a Comment