पुणे : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतेच राज्यातील औद्योगिक प्रदूषणाबाबतचे ‘रिपोर्ट कार्ड’ जाहीर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील 45.1 टक्के कंपन्या या ‘थ्री स्टार’ म्हणजेच कमी प्रदूषक असून, सुमारे 38.3 टक्के कंपन्या या एक स्टार म्हणजे सर्वाधिक प्रदूषक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्टार रेटिंग उपक्रमात पुण्यातील 21 कंपन्यांचा समावेश आहे. एकूणच कमी प्रदूषित कंपन्यांची संख्या जास्त असली, तरी तुलनेने कमी परंतु अत्याधिक घातक कंपन्यांचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.
No comments:
Post a Comment