Saturday, August 25, 2018

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैेसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment