पौडरस्ता - मोहिते महाविद्यालयामधील युवकांना खराडीला बुद्धिबळ स्पर्धेसाठी साडेनऊला पोचायचे होते. नेटवर सर्च केल्यावर, सात तीसला वारज्याहून निघणारी बस सात सदतीसला कोथरूड स्टॅंडमार्गे जात असल्याचे दिसले. पौडरस्त्यावरून थेट बस नव्हती. कोथरूड स्टॅंडला चौकशी केली, तेव्हा बसला टाइमटेबल नाही. भरवशावर राहू नका, हे उत्तर ऐकायला मिळाले. तासाभरात अगदी तुडुंब भरलेल्या तीन बस वाघोलीकडे गेल्या; पण खराडीची बस आली नाही. स्थानकावर लावलेल्या पीएमपीएल हेल्पलाइनचा नंबर कोणी उचलत नव्हते. ‘एसएमएस’चेही उत्तर आले नाही. बस गुगलवर असते; पण रस्त्यावर नाही, याचे प्रत्यंतर या युवकांना आले. अखेर या युवकांनी रिक्षाने खराडी गाठली; पण उशीर झाल्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेता आला नाही.
No comments:
Post a Comment