पुणे - म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वाहनांना पाडळे पॅलेस चौकाऐवजी नळस्टॉप चौकातून यू टर्न घेऊन गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉल, नवी पेठ किंवा डेक्कन परिसरात जाता येईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. २७) होणार आहे.
No comments:
Post a Comment