Tuesday, August 28, 2018

खड्डे खोदल्यास मंडळाला २००० दंड

गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यासाठी फूटपाथ तसेच सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे खोदल्यास मंडळाला प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद महापालिकेने तयार केलेल्या मंडप धोरणात करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने हे धोरण तयार केले असल्याने न्यायालयाचा अवमान होऊ नये, यासाठी त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment