Tuesday, August 28, 2018

सोलर पॅनल लावण्यास महापालिकेकडून गती

पुणे महापालिकेच्या विविध इमारतींवर सोलर पॅनल लावण्याच्या योजनेला गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, घोले रोड आर्ट गॅलरी, नायडू हॉस्पिटल आणि कमला नेहरू रुग्णालयाच्या छतावर ही सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या चारही ठिकाणी मिळून २६ हजार ४६० युनिट विजेची निर्मिती होणार असून यामुळे पालिकेच्या दर वर्षी विजेवरील खर्चाची १८ लाख ८५ हजार रुपयांची बचत होणार आहे. महाराष्ट्र रेस्को रूफ टॉप सोलर प्रा. लि. या कंपनीकडून हे काम करून घेतले जाणार आहे.

No comments:

Post a Comment