पुणे - अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर असेल. वाहनचालकांना दंड आकारणे, कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नाही. मात्र, नागरिकांनीही वाहतुकीबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment