Tuesday, August 28, 2018

सिव्हिल कोर्ट येथील मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा

वनाज ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचे काम सध्या जोमाने सुरू असताना सिव्हिल कोर्टापासून रामवाडीपर्यंतचे कामही महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रस्त्यामध्ये बॅरिकेटिंग टाकून माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे आता शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारग़ेट, वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते रामवाडी अशा तीनही पातळ्यांवर मेट्रो बांधकामाचे काम सुरू असणार आहे. सिव्हिल कोर्टाजवळील काम सुरू झाल्यामुळे या प्रकल्पाला गती प्राप्त होणार आहे. कारण याठिकाणी तीन इंटरचेंज मेट्रो  स्टेशनस असणार आहेत, अशी माहिती वनाज ते रामवाडी (रिच 2) चे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment